रिस्क मॅनेजमेंट

सध्या परिस्थिती अतिशय बिकट आहे. कधीही कोणाचीही नोकरी जाऊ शकते. तसं  म्हटलं तर अमेरिकेत ही स्थिति खूप पूर्वीपासूनच आहे. भारतात असा अनुभव फार लोकाना येत नसे म्हणून स्थिति इतकी गंभीर न्हवती, हाच काय तो फरक. मी लार्सेन एंड टुब्रो कंपनीत काम करत होतो त्यानंतर काही वर्षातच माझ्याच डिपार्टमेन्ट मध्ये खूप लोकाना हाकलण्यात आले, हे माझ्या बघण्यात आहे. माझ्या नशीबाने फार पूर्वीच सावध करण्यात आले होते, म्हणून मी वाचलो.

मी हिरमीजवळ सीमेंट प्लांट सुरु करण्याचे काम करत होतो तेव्हाची गोष्ट. सीमेंट प्लांट मध्ये पैकिंग मशीन असते जे बरोबर ५० किलो सीमेंट बैगमध्ये भरायचे काम करते. त्या मशीनला ट्यून करावे लागते, जे काम कोणातरी कामगाराला करावे लागते. तिथे १ वर्कर होता जो पैकिंग मशीन ट्यून करण्यात एकदम उस्ताद होता, पण तो कधीच कोणाला काही शिकवत असे, असे मी ऐकून होतो. साईट वर १ हलकट मैनेजर होता, जो मला १ मोठा Silo चा वजनाचा काटा ट्यून करण्यासाठी खूप छळत होता. कोणीतरी सांगितले म्हणून मी त्या पैकिंग मशीन च्या वर्करकड़े मदत मागायला गेलो तर त्याने मला हाकलून च लावला. तरी मी त्याच्यामागे लागलो की मला शिकव ट्यूनिंग कसा करायचा ते. तेव्हा त्याने सांगितलेले शब्द अजून माझ्या लक्षात आहेत. तो म्हणाला, "बेटा, तुम अभी बहुत छोटे हो, कुछ साल बाद सीखोगे. लेकिन एक बात हमेशा याद रखना, घोडा अगर घास से दोस्ती करेगा तो खायेगा क्या?"

त्याचे अनुभवाचे बोल मला तेव्हा समजले नाहीत, पण आता इतक्या वर्षानी पूर्णपणे पटले आहेत. नशीबाने आजही ज्या लोकांच्या नोकरया चालू आहेत, त्यांच्यासाठी हे माझे २ शब्द.

१. नेहमी आंथरूण पाहून पाय पसरवा, म्हणजे जेव्हडे उत्पन्न आहे त्यापेक्षा कमी खर्च करा आणी बचत करा.

२. जरूरीपेक्षा जास्त कर्ज घेऊ नका, ज्यामुळे कर्जाचे हप्ते देणे कठीण होऊ शकेल.

३. तुमची कामाची पध्हत आणी तुमचे ख़ास गुण कधीच कोणाला सांगू नका. फक्त रिझल्ट दाखवा.

४. तुमच्या बॉस ला कधीच द्यान देऊ नका अणि त्याना हुशार बनवू नका.

५. नेहमी हुशारीने काम करा आणी १ नोकरी सुरू असतानाच दुसर्या नोकरीचा शोध घ्या.

६. मैनेजमेन्टवर विश्वास ठेवण्यापेक्षा स्वताच्या कामावर आणी कर्ताबगारीवर विश्वास ठेवा.

७. नेहमी शिकत रहा. तुमचे स्किल नेहमी वाढवत रहा.

८. सगळ्यात महत्वाचे म्हणजे कुणाचीही नोकरी कधीही जाऊ शकते, म्हणून नेहमी डोळे व कान उघडे ठेवा आणी तोंड बंद.

जमल्यास पुढील विडियो बघा.

मराठी: 
Rating: