माझे शिक्षण पुण्यात झाले तेव्हा आलेला एक अनुभव.
मी इंजीनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहात होतो तेव्हा आमची खानावळ होती, तिचे नाव F Club. तिथे काम करायला विठृ्लराव होते. ते दर महिन्याला आम्हाला बिल द्यायचे आणी ते एका बँकेत भरावे लागायचे. ती बैंक जंगली महाराज रोड वर होती. (आता नाव विसरलो.) तिथे काम करणारा कॅशियर एकदम उद्धट होता, पण महिन्यातून एकदाच त्या बँकेत जाणे होत असे, त्यामुळे मला कधी फारसा त्रास झाला नही. पण एकदा मात्र तशी वेळ आली.
एकदा मी घाई-घाईत बँकेत बिलाचे पैसे भरायला गेलो तेव्हा slip च्या मागे १०० च्या किती नोटा, ५० च्या किती नोटा ते लिहायला विसरलो. नशिबाने समोर नेमके तेच कॅशियर. अंगावर एकदम खेकसले "हे काय, मागे एंट्री कोण करणार? मी म्हणालो, चूक झाली, घाई-घाईत आलो म्हणून विसरलो, जरा स्लिप द्या, आत्ता भरून देतो किंवा तुम्ही जरा please भरलेत तर बरे होईल. तर ह्या महाशयाना राग आला आणी ती स्लिप माझ्या अंगावर भेकून म्हणाले "ते काही आमचे काम नाही. नीट काम करता येत नाही तर येता कशाला इथे मरायला? नीट स्लिप भरून ये नंतर." मी ठीक आहे म्हणालो.
त्या दिवशी संध्याकाळी मी माझ्या मावसभावाच्या दुकानावर गेलो (त्याचे अप्पा बलवंत चौकात दुकान होते.) त्याच्याकडून मी १ रुपयाची ४०० नाणी घेतली. त्यापैकी २ नाणी बदलून २ रुपयाचे १ नाणे टाकले. दुसरया दिवशी दुधाच्या एका रिकाम्या पिशवीत हे सगळे पैसे भरून ऐन गर्दीच्या वेळी मी पुन्हा बँकेत हजर झालो आणी लायनीत उभा राहिलो. समोर तेच कॅशियर पुन्हा होते. मी स्लिप आणी दुधाची पिशवी समोर ठेवली.
लगेच साहेब खेकसले, हे काय आहे?
मी: पैसे
कॅशियर: आता गर्दी आहे. नंतर या.
मी: का म्हणून? मी लायनीत आलो आहे.
कॅशियर: बर मग, पैसे ठेउन जा. नंतर पावती घेउन जा.
मी: मला नंतर यायला वेळ नाही. मी लायनीत आलो आहे, आणी बँकेची वेळ संपली नाही अजून, त्यामुळे मी थांबतो की.
कॅशियर: हे इतके सुटे पैसे मोजायला वेळ लागेल. नोटा घेउन या.
मी: हे भारतीय रिज़र्व बँकेने जारी केलेले पैसे आहेत. तुम्ही ते घ्यायला नकार देत असाल तर मला तसे कागदावर लिहून द्या, मग मी काय करायचे ते बघतो.
कॅशियरसाहेबानी कुरकुरत पैसे मोजायला सुरुवात केली. अपेक्षेप्रमाणे २ रुपयाचे नाणे आणी १ रुपयाचे नाणे यांचा आकार जवाळपास सारखा असल्यामुळे त्यांचा गोंधळ झालाच.
कॅशियर: हे ४०० रुपये नाहीत. ३९९ च आहेत.
मी: तुम्हाला ते २ रुपयाचे नाणे मिळाले का? दाखवा माला. मी स्लिपच्या मागे तुमच्या नियमानुसार १ रुपयाची ३९८ नानी अणि २ रुपयाचे १ नाणे असे ४०० रुपये म्हणून लिहिले आहे.
आता कॅशियरच पारा चढायला लागला.
कॅशियर: ही दुधाची थैली घेउन जा तुमची. पैसे कमी आहेत.
मी: अहो, असा चालणार नाही. ग्राहकाचे पैसे घेउन अफरातफर केल्याचा मला संशय आहे. मला तक्रार करायची आहे.
कॅशियर: मग मेनेजरबरोबर बोला.
मी: अहो असं कसं, मेनेजर ला बोलावा इथे. मी गरीब विद्द्यार्थी आहे. माझ्या दृष्टीने १ रुपयाला खूप किम्मत आहे. तुम्हीच बोलवा त्याला इथे. त्याला इथे येउन कॅश चेक करू दे किती आहे ते, आणी ठरवू दे.
एव्हाना लायनीमधले लोक ओरडायला लागले. ते ऐकून मेनेजर पण आला तिथे की काय चालु आहे ते बघायला. त्याला मी शांतपणे सांगितले, काल काय झाले आणी आज काय झाले. ते ऐकून मेनेजर त्या कॅशियरला म्हणाला की याला ४०० रुपयाची पावती देऊन मोकळे करा. मी माझ्या जबाबदारीवर ४०० रुपये accept करतो.
त्या दिवसानंतर त्या कॅशियरने मला कधीही त्रास दिला नही. अगदी कळ्कट, फाटक्या नोटा मी त्याला दिल्या तरीही.