सचिनचे महाशतक

सचिनने शतक केले म्हणून त्याचे अभिनंदन.

मला क्रिकेटबद्दल फारसे काही माहीत नाही, म्हणून लेखात दिलेला दुवा बघितला आणि शोधताना रेकॉर्डचे स्थळ दिसले. त्यावरून मला पडलेले काही प्रश्न.

कसोटी सामन्यात व वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा म्हणून सचिन सर्वप्रथम स्थानावर आहे.
तसेच सर्वाधिक शतके म्हणून सुध्दा सचिन पहिला आहे आणि त्याची कारकीर्द १९८९ पासून सुरू झाली असे दिसते.

रिकी पोंटिंग व कालीस यांची ४१ व ४२ कसोटी शतके झाली आहेत आणि ते १९९५ पासून खेळत आहेत. मग ते सचिन इतके सरस नाहीत का? किंवा सचिनपेक्षा अजून ५-६ वर्षे खेळले तर त्याचे रेकॉर्ड ते मोडू शकणार नाहीत का?

इतर अनेक कॅटेगरी मध्ये सचिन पहिल्या ३ खेळाडूंमध्ये नाही. उदा. एका इनिंगमध्ये सर्वाधिक धावा, सामन्यात सर्वाधिक धावा, सिरीजमध्ये सर्वाधिक धावा, एका षटकात सर्वाधिक धावा, एका दिवसात सर्वाधिक धावा, सर्वाधिक धावा सरासरी वगैरे.

असे असताना सचिन म्हणजे क्रिकेटचा देव वगैरे इतका उदो उदो का होतो? त्याचे इतर काही विक्रम आहेत का जे तुटण्याची शक्यता नगण्य आहे? (ब्रायन लाराने केलेला ३७५ धावांचा विक्रम मोडला गेला, तर त्याने ४०० धावांचा विक्रम केला जो मोडणे कठीण आहे, असे मला वाटते. सचिनचे असे काही विक्रम आहेत का? ) मी विकिपिडीया बघीतला पण अशी काही माहिती मिळाली नाही. बहुतेक इतर विक्रम म्हणजे सर्वाधिक धावा/शतके यांचे sub-records आहेत असे वाटले.

मी प्रामणिकपणे शंका विचारली आहे. सचिन काय फालतू खेळाडू आहे किंवा इतर किती भारी खेळाडू आहेत, असे म्हणण्याचा अजिबात प्रयत्न नाही, हे कृपया लक्षात घ्यावे.

 

 

मराठी: 
Rating: