मनातलं

सचिनचे महाशतक

सचिनने शतक केले म्हणून त्याचे अभिनंदन.

मला क्रिकेटबद्दल फारसे काही माहीत नाही, म्हणून लेखात दिलेला दुवा बघितला आणि शोधताना रेकॉर्डचे स्थळ दिसले. त्यावरून मला पडलेले काही प्रश्न.

कसोटी सामन्यात व वन-डे सामन्यात सर्वाधिक धावा म्हणून सचिन सर्वप्रथम स्थानावर आहे.
तसेच सर्वाधिक शतके म्हणून सुध्दा सचिन पहिला आहे आणि त्याची कारकीर्द १९८९ पासून सुरू झाली असे दिसते.

मराठी: 

सरकारी "खा"त्याचा अनुभव

माझ्या बहिणीचे लग्न झाल्यानंतर (१९९६ ची गोष्ट ) मी तिच्या विवाहाचे प्रमाणपत्र आणायला ठाण्याला सरकारी ऑफिसात गेलो होतो. समोर ५० च्या आसपास वयाचे ग्रुहस्थ होते. नेहमीच्या अनुभवावरून मी चहापाण्याची चौकशी केली. तर ते मला म्हणाले, "आम्ही लग्नाच्या वेळी आणि मयताच्या वेळी पैसे घेत नाही." हे ऐकुन मी थक्कच झालो. पण तरी खात्री करण्यासाठी परत विचारले की अहो, फूल ना फुलाची पाकळी समजून काही पाहिजे तर सांगा, तर मला म्हणाले "नाही, काही नको.

मराठी: