Uday's website
Published on Uday's website (https://uday.net)

Home > विनोदी कविता

विनोदी कविता [1]

Submitted by uday [2] on August 19, 2014 - 1:06pm

तू सुई, मी दोरा
तू काळी, मी गोरा

तू पोळी, मी भात
तू फुटबॉल, मी लाथ

तू बशी, मी कप
तू उशी, मी झोप

तू बॉल, मी बॅट
तू उंदीर, मी कॅट

मी मुंगळा, तू मुंगी
तू साडी, मी लुन्गी

तू लव्ह, मी प्रेम
तू फोटो, मी फ्रेम

तू डोकं, मी केस
तू साबण, मी फेस

तू निसर्ग, मी फिजा
तू कविता, "मी माझा"

तू घुबड, मी पंख
तू विंचू, मी डंख

तू साम्बार, मी डोसा
तू बॉक्सर, मी ठोसा

तू कणीक, मी पोळी
तू औषध, मी गोळी

तू पेट्रोल, मी कार
तू दारु, मी बार

तू दूध, मी साय
तू केस, मी डाय

तू चहा, मी लस्सी
तू कुमकुम, मी जस्सी

तू तूप, मी लोणी
तू द्रवीड, मी धोनी

तू बर्फी, मी पेढा
तू बावळट, मी वेडा

तू कंप्यूटर, मी सीडी
तू सिगरेट, मी बीडी

तू दही, मी लोणी
तू केस, मी पोनी

तू कंप्यूटर, मी मेल
तू निरांजन, मी तेल

तू टायगर, मी लायन
तू दादर, मी सायन

तू टक्कल, मी केस
तू कॅन्टीन, मी मेस

तू केस, मी कोंडा
तू दगड, मी धोंडा

लोकांना काहीही दाखवा किंवा पाठवा, वाचत बसतात

मराठी: 
कविता [3]
Rating: 

 Valid XHTML 1.0 StrictCreative Commons LicenseVerbatim copying and redistribution of this entire page are permitted provided this notice is preserved. All content on this website including archives (including text, photographs, audio files and any other original work), unless otherwise noted, is licensed under a Creative Commons License or later.


Source URL:https://uday.net/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE

Links
[1] https://uday.net/%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A8%E0%A5%8B%E0%A4%A6%E0%A5%80-%E0%A4%95%E0%A4%B5%E0%A4%BF%E0%A4%A4%E0%A4%BE [2] https://uday.net/user/1 [3] https://uday.net/taxonomy/term/45